Rajasthan CM Latest Update – राजस्थानात सत्तासंघर्ष; वसुंधरा राजेंसोबत 8 वेळा आमदार झालेले कालीचरण सराफ मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Rajasthan CM Latest Update –  राजस्थान मध्ये भाजपला विधानसभा निवडणुकीत यश मिळाले आहे. परंतु आता मुख्यमंत्री पदाचा पेच निर्माण झाला आहे. राजस्थान मध्ये कोण मुख्यमंत्री होणार याकडे सर्व जनतेचे लक्ष लागले आहे.

वसुंधरा राजे ( Vasundhara Raje ) यांनी जयपुर मध्ये मोठे शक्ती प्रदर्शन करत मुख्यमंत्री पदासाठी दावा सांगितला आहे. अनेक आमदार त्याना भेटायला येत असल्याचे चित्र आहे. पण भाजपाचे वरिष्ठ नेत्यांनी मुख्यमंत्री पदाबाबत कुठलाही ठोस निर्णय दिलेला नाही. त्यामुळे राजस्थान मध्ये सत्ता पेच निर्माण झाला आहे.

भारतीय जनता पार्टीचे राजस्थान प्रभारी अरुण सिंह म्हणाले, केंद्रीय नेतृत्व आणि संसदीय बोर्ड जो निर्णय घेईल तो आम्हाला सर्वाना मान्य असेल. त्यानंतर ते भाजप कार्यालयात गेले. भाजप कार्यलयात अनेक नवनिर्वाचित आमदार येत आहेत.

पूर्व सीएम वसुंधरा राजे ( Vasundhara Raje ) यांच्या निवासस्थानावर सतत आमदार येत आहेत. एकप्रकारे वसुंधरा राजे यांचे हे शक्ति प्रदर्शन मानले जात आहे. त्यांच्या निवासस्थानावर नवनिर्वाचित आमदार पोहोचत आहेत. वसुंधरा राजे मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत सर्वात पुढे आहे. आज 50  हुन अधिक आमदारांनी भेट घेतल्याचे कळत आहे आणि उद्या आणखी आमदार भेट घेणायची शक्यता आहे.

8 वेळा आमदार झालेले कालीचरण सराफ यांच्या सोबत ज्येष्ठ नेते ओमप्रकाश माथूर, गजेंद्र सिंह शेखावत, अर्जुन राम मेघवाल, दिया कुमारी, प्रदेशाध्यक्ष सीपी जोशी, अश्विनी वैष्णव, भूपेंद्र यादव, बाबा बालकनाथ आणि डॉ. किरोडीलाल मीणा यांची नावे मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत आहेत.

दरम्यान, भाजप मुख्यमंत्री पदासाठी नवीन चेहरा देणार असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे सत्ता संघर्ष होईल कि वसुंधरा राजे मुख्यमंत्री होतील हे येणाऱ्या काळात समजेल.

वसुंधरा राजे यांची भेट घेतलेले आमदार 

कालीचरण सराफ, बाबू सिंह राठौड़, प्रेम चंद बैरवा, गोविंद रानीपुरिया, कालू लाल मीणा, केके विश्नोई, प्रताप सिंह सिंघवी, गोपीचंद मीणा, बहादुर सिंह कोली, शंकर सिंह रावत, मंजू बाघमार, विजय सिंह चौधरी, पुष्पेंद्र सिंह आणि शत्रुघ्न गौतम त्यानंतर मंगळवारी भेट घेतलेले आमदार जोगाराम पटेल, अरुण अमरा राम, अर्जुन गर्ग, संजीव बेनीवाल, अजय सिंह.

महत्वाच्या बातम्या