पंकजा मुंडेंचे मानसिक संतुलन बिघडत चाललंय ; कॉंग्रेस नेत्याचा घणाघात

टीम महाराष्ट्र देशा : राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांनी जालना येथील प्रचारसभेत बोलताना राहुल गांधींवर केलेल्या वक्तव्याचा हिमाचल प्रदेशच्या प्रभारी व काँग्रेसच्या नेत्या रजनी पाटील यांनी खरपूस समाचार घेतला. मुंडेंवर व भाजपवर हेच संस्कार आहेत का? असा सवाल पाटील यांनी ट्वीट करून केला.

मंत्री पंकजा मुंडे यांनी जालना येथील प्रचारसभेत बोलताना राहुल गांधी यांना एखाद्या बॉम्बला बांधून दुसऱ्या देशात टाकायला हवं होतं म्हणजे त्यांना सर्जिकल स्ट्राईक समजेल अशी टीका केली होती. त्याला उत्तर देताना रजनी पाटील यांनी पंकजा मुंडे यांचे मानसिक संतुलन बिघडत चालले आहे . मुंडेंवर व भाजपवर हेच संस्कार आहेत का ? अस ट्विट करत मुंडेंवर निशाणा साधला आहे.Loading…
Loading...