fbpx

शिवसेनेचे ठाण्याचा गड राखला, राजन विचारे विजयी

टीम महाराष्ट्र देशा- ठाण्यात शिवसेनेची आघाडी कायम असून राजन विचारे १ लाखांच्या मतांनी आघाडी कायम ठेवत मोठा विजय मिळविला आहे. ठाणे हा शिवसेनेचा गड आहे. ठाण्यावर अनेक वर्षं शिवसेनेचं वर्चस्व आहे. यावेळी शिवसेनेने विद्यमान खासदार राजन विचारे यांनाच इथून उमेदवारी दिली. तर, राष्ट्रवादीचे आनंद परांजपे यांनी त्यांना आव्हान दिलं आहे.

दरम्यान, उत्तर मुंबई मतदारसंघात काँग्रेसने अभिनेत्री उर्मिला मातोंडकर हिला मैदानात उतरले होते. मात्र, सुरुवातीला चुरसीची वाटणारी ही निवडणूक आज प्रत्यक्ष निकालाच्या दिवशी विद्यमान खासदार गोपाळ शेट्टी यांनी पुन्हा कौल देताना दिसून येत आहे.