मंद अर्थवृद्धीला ‘राजन’च जबाबदार ; नीती आयोगाचा ठपका

टीम महाराष्ट्र देशा : नोटाबंदीनंतर देशाच्या अर्थकारणाला व विकास दराला बसलेल्या धक्क्याबाबत राजकीय व आर्थिक विश्वात मतमतांतरे व्यक्त होत असतानाच, नीती आयोगाने मात्र मंद अर्थवृद्धीचा ठपका रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांच्यावर ठेवला आहे.

‘राजन यांनी बँकांची बुडित कर्जे निश्चित करण्याची नवी यंत्रणा निर्माण केली. यामुळे अशा कर्जांचा आकडा वाढला. त्यातूनच कर्जांसाठी उद्योगांना दिल्या जाणाऱ्या क्रेडिटवर बँकांनी निर्बंधे आणली. विकास दरवाढीच्या मंदावलेल्या वेगाला नोटाबंदी नव्हे, तर तत्कालीन गव्हर्नर रघुराम राजन हेच जबाबदार आहेत’, असा निष्कर्ष नीती आयोगाचे उपाध्यक्ष राजीव कुमार यांनी काढला आहे.