fbpx

मराठा समाजाला चोर म्हणणाऱ्या राजाभाऊ कदमांचा माफीनामा

टीम महाराष्ट्र देशा : मराठा समाजाला चोर म्हणणाऱ्या बहुजन संघर्ष सेनेच्या राजाभाऊ कदम यांनी मराठा समाजाची माफी मागितली आहे. त्यांनी माफी मागताना मला मराठा बांधव माफ करतील असा विश्वास व्यक्त केला आहे. त्यामुळे कदम यांच्या या वक्तव्यानंतर त्यांच्यावर टीकेची झोड उठली होती. त्यामुळे त्यांनी आता माफी मागितली आहे.

काय आहे प्रकरण…

बहुजन संघर्ष सेनेचे राजाभाऊ कदम यांनी भूमीहीनांच्या हक्कासाठी जन आक्रोश मोर्चाचे आयोजन केले होते. या मोर्चाचा समारोप करताना आपल्या भाषणातुन मराठा समाजाबद्दल आक्षेपार्ह विधान केले होते. याबाबत सकल मराठा समाजाने निषेध व्यक्त करीत बहुजन संघर्ष सेनेचे कदम यांच्याबर कारवाई करावी अशी मागणी सकल मराठा समाजाच्या वतीने करण्यात आली होती.

याबाबत पोलिस निरिक्षक सर्जेराव पाटील यांना निवेदन देण्यात आले होते. याबाबत आपण गांभीर्याने विचार करुन योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन पाटील यांनी दिले आहे. भूमीहीनांना हक्क मिळवुन देण्यासाठी तहसिल कार्यालय येथे बहुजन संघर्ष सेनेच्या वतीने मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी आमदार नारायण पाटील यांच्यासह इतर मान्यवरही उपस्थित होते.

यावेळी सर्वांनी मनोगत व्यक्त केल्यानंतर कदम यांनी माईकचा ताबा घेतला व पारधी समाजाचा चोरी करत असेल तर तर पुर्ण समाजाला दोष दिला जातो तसाच मराठा समाजही चोऱ्या करतो असे विधान केले होते. याची माहीती सोशल मिडियाच्या माध्यमातून सकल मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांच्या निदर्शनास आली. त्यानंतर तालुका भरतातुन त्यांच्या या वक्तव्याचा निषेध करण्यात आला होता.

त्यानंतर मराठा समाजाच्या वतीने पोलिस निरिक्षक पाटील यांच्या कडे जाऊन याबाबत रितसर तक्रार केली होती. त्यानंतर आपण याबाबत योग्य ती कारवाई करु असे आश्वासन मिळाल्यानंतर मराठा समाजाच्या वतीने माघार घेतली आहे. यावेळी विवेक येवले, नागेश माने, महादेव फंड, सुनिल सावंत, प्रविण जाधव, आण्णासाहेब पवार, अशपाक जमादार, विनोद महानवर आदिसह सकल मराठा समाजाचे शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.