‘माहितीच्या अधिकाराखाली शिक्षण विचारलं तर मोदींनी कायदाचं बदलला’

टीम महाराष्ट्र देशा :लोकसभा निवडणूकीनंतर आता सर्वत्र विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. सर्वच पक्षांनी पक्षबांधणी, राजकीय दौरे, भेटीगाठी यांसारख्या राजकीय घडामोडींना उधाण आले आहे. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनी मुंबईत आज कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन केले होते.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी या मेळाव्यात कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी राज्य आणि केंद्र सरकारवर जोरदार हल्ला चढवला. माहिती अधिकार कायद्यावर बोलताना ठाकरे यांनी ‘मोदी यांना B.A. पास की नापास विचारलं म्हणून माहिती अधिकार कायदाच बदलला’ अशी टीका त्यांनी मोदी सरकारवर केली. तसेच माहिती आयुक्तांचा कार्यकाळ, त्यांचा पगार सरकारने ठरवायचा, असा कायदा पारित करून घेतला अस ठाकरे म्हणाले.

तसेच पुढे बोलताना ठाकरे यांनी या निर्णयामुळे माहिती आयुक्तांची स्वायत्तता संपुष्टात आणली गेली. मोदींचं नक्की शिक्षण काय आहे ह्याची माहिती माहिती अधिकाराखाली मागवली गेल्यापासून हा कायदाच बदलला आहे. तेव्हापासून ह्या कायद्यावर अंकुश आणायचा निर्णय घेतला गेला, अशी टीका राज ठाकरे यांनी केली आहे.

दरम्यान , लोकसभा निवडणुकीतही राज ठाकरे यांनी वारंवार मोदी सरकारला लक्ष केले होते. त्यांनी एकही उमेदवार न उभा करता निवडणुकीच्या प्रचारात सहभाग नोंदवला होता. आणि आताही ठाकरे यांनी माहिती अधिकार कायद्यावरून मोदींना लक्ष केले आहे.

बचावकार्यासाठी एनडीआरएफच्या पूरग्रस्त भागात २८ टीम कार्यरत – सुभाष देशमुख 

 

वाद पेटणार : गणेशोत्सवात रात्री दहानंतर देखावे सुरु ठेवावे, पतित पावन संघटनेची मागणी

 

‘यांना माहिती आहे सत्ता यांचीचं येणार , त्यामुळे भाजप नेत्यांना माज आलाय !’