राज ठाकरे हेच खरे ” जाणते राजे ”

टीम महाराष्ट्र देशा : महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे हा कलाकारांना जाणणारा खरा ‘जाणता राजा’ आहे, मध्यमवर्गातून आलेल्या माझ्यासारख्या अनेक कलावंतांना स्वस्त दरात, नियमाने परडवणारी घरं मिळावीत म्हणून स्वत: राज ठाकरेंनी स्वतः पाठपुरावा केला. असा मराठी कलाकारांना जाणणारा हा ‘जाणता राजा’ आहे , अशा शब्दात प्रख्यात अभिनेते संजय नार्वेकरांनी स्तुतिसुमनं उधळली आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या महाअधिवेशनात मनसे चित्रपट सेनेचे उपाध्यक्ष संजय नार्वेकर बोलत होते.

संजय नार्वेकरांनी याच कार्यक्रमात ‘सांस्कृतिक महाराष्ट्र’ हा ठराव मांडला. राज ठाकरे यांना ‘जाणता राजा’ संबोधण्यावरुन वादंग होईल, म्हणून स्पष्टीकरण देतो, राजसाहेबांचा शॉर्टफॉर्म ‘राजा’ असा होतो. त्यामुळे ‘जाणता राजा’, असंही संजय नार्वेकर यांनी पुढे स्पष्ट केलं.

Loading...

संजय नार्वेकरांनी कलाकारांशी संबंधित अनेक महत्त्वाचे मुद्दे ठरावात मांडले. “छत्रपती शिवाजी महाराजांची खरं स्मारकं असलेल्या गडकिल्ल्यांचं संवर्धन, नाट्यगृहांची दुरावस्था सुधारावी. प्रायोगिक रंगभूमी जोपासणं ती वृद्धिंगत करणं गरजेचं, मराठी चित्रीकरणासाठी एक खिडकी परवानगी कक्ष स्थापन व्हावा आणि मराठी चित्रपटांना हक्काचं स्थान मिळालंच पाहिजे, त्यासाठी आम्ही कार्यरत राहू”, असं नार्वेकर म्हणाले.

२३ जानेवारीला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आपला झेंडा बदलवून हिंदुत्वाची कास धरली आहे.तर आता राज ठाकरे ‘जाणता राजा ‘ झाले आहेत.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

अजय देवगणजी खूप कमवल आता तान्हाजी मालुसरेंच्या वंशजांना आर्थिक मदत करा - मनसे
आम्ही रात्रीच्या वेळी झोपूही शकत नाही ; आम्हाला येथे अजिबात सुरक्षित वाटत नाही
हे सरकार पडले तर 'आम्हाला' दोष देऊ नका...
व्याह्याला वाचवण्यासाठी संजय काकडेंची धडपड
'अजित पवारांना पुन्हा आमच्याबरोबर यायचं दिसतंय'
...त्यामुळे पहिल्यांदाच मला सभागृहात बसावं असं वाटल - उद्धव ठाकरे
अभिमान आहे सर तुमचा : संपूर्ण शहरात दहशत असणाऱ्या गुंडाच्या अनधिकृत बंगल्यावर मुंढेंचा हातोडा
कीर्तने पोलीस बंदोबस्तात करावी लागतात हीच तर माझी दहशत - तृप्ती देसाई
'स्व. बाळासाहेब होते का स्वतंत्र लढ्यात', निलेश राणेंचा शिवसेनेवर पलटवार
छगन भुजबळांच्या विरोधात गेला तो 'संपला' ! वाचा काय आहे प्रकरण