fbpx

राज ठाकरे गुरुवारी सातारा दौ-यावर

raj-thackeray

सातारा : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे येत्या गुरुवारी (दि. 1 फेब्रुवारी) मनसेच्या पदाधिकारी मेळाव्यासाठी सातारा दौ-यावर येत आहेत. या दौ-यादरम्यान मनसेचे राज्य उपाध्यक्ष संदीप मोझर यांच्या नेतृत्वाखाली विविध आंदोलनांना बळ लाभणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. सातारा जिल्हा परिषदेच्या नूतन यशवंतराव चव्हाण ऑडिटोरियममध्ये गुरुवारी सकाळी 11 वाजता मनसेचा पदाधिकारी मेळावा होणार आहे.

राज याचे विचार ऐकण्यासाठी जिल्हयात येणा-या महाराष्ट्र सैनिकांसह नागरिकांच्या सोयीसाठी सभागृहाबाहेर मोठया एलईडी स्क्रिनवर भाषण ऐकण्याची सुविधाही उपलब्ध राहणार आहे. राज याच्या दौ-यामुळे मनसे पदाधिकारी व महाराष्ट्र सैनिकांमध्ये चैतन्य निर्माण झाले असून पदाधिकारी मेळावा व दौ-याची तयारी युध्दपातळीवर सुरु झाली आहे. जाहिर कार्यक्रमासाठी प्रथमच साता-यात येत आहे. याच्या जिल्हयातील स्वागताचे नेमके व नेटके नियोजन सुरु असून जिल्हयाच्या सरहद्दीवर शिरवळसह महामार्गावर ठिकठिकाणी त्यांच्या जोरदार स्वागताचे नियोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी महाराष्ट्र सैनिकांसह नागरिकांनी व विविध आंदोलनांमध्ये अग्रेसर राहणा-या जिल्हयातील सर्वांनी मोठया संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन मनसेचे राज्य उपाध्यक्ष संदीप मोझर यांनी केले आहे.