मराठा मोर्चात आलेले 98 टक्के लोक भाबडे; इतरांना राजकारण करायचंय होत – राज ठाकरे

raj thakrey

मराठा मोर्चात आलेले ९८ टक्के लोक हे भाबडे होते तर इतरांना मोर्चाचे केवळ राजकारण करायचं होत असा आरोप राज ठाकरे यांनी केला आहे. ब्राम्हण सेवा मंडळाकडून दादरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या प्रकट मुलाखती वेळी राज ठाकरेंनी बोलताना अनेक मुद्यांना हात घातला त्यावेळी त्यांनी मराठा मोर्चात करण्यात आलेल्या राजकारणावर टीका केली आहे.

पुढे राज म्हणाले, आपण पक्षात जात पाहून कोणाला तिकीट देत नाही.मात्र, जातीची आरक्षणं असतात तेव्हा माणसं शोधावी लागतात आर्थिकदृष्ट्या मागासांनाच फक्त आरक्षण देण्यात याव. तर आरक्षण या गोष्टीलाच माझा विरोध असल्याच राज ठाकरे यांनी यावेळी सांगितल आहे.