राज ठाकरे लिहिणार ‘या’ जेष्ठ गायिकेवर पुस्तक

राज ठाकरे

पुणे : राज ठाकरे हे एक उत्तम राजकारणी आहेत, तसेच ते एक उत्तम वक्ते देखील आहेत. त्यांच्या भाषणाला लाखोंची गर्दी होत असते. ते एक उत्कृष्ट व्यंगचित्रकार देखील आहेत. त्यांना त्यांचे काका, शीवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याकडून व्यंगचित्रकलेचा वारसा मिळाला, तसेच त्यांना संगीताची देखील उत्तम जाणआहे. मात्र आता या पलीकडेही जाऊन एका वेगळयाच अंदाजात राज ठाकरे महाराष्ट्राच्या भेटीला येणार आहेत.

राज ठाकरे गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या जीवनावर पुस्तक लिहिणार आहे. या पुस्तकातून राज ठाकरे लता दीदींचा जीवनपट उलगडणार आहेत. त्यांनी यासाठी लतादीदी यांच्या दुर्मिळ छायाचित्रांसाठी पुण्यातील राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय (एनएफएआय) आणि भारतीय चित्रपट आणि दूरदर्शन संस्थेला भेट दिली. या दोनही संग्ग्रहालयात त्यांनी लता दीदी यांचे दुर्मिळ फोटो बघितले. व हे फोटो आपल्याला पाठवण्याची विनंती त्यांनी सबंधित संस्थेला केली. आता हे फोटो राज ठाकरे यांना पाठवण्यात येणार आहेत.

आर्थिक आधारावर आरक्षण देण्याची मायावती यांची मागणी

मशिदीवरचे भोंगे बंद होत नाहीत, मग हिंदूच्या सणांना आडकाठी का?