राज ठाकरे पडले तोंडघशी; ‘तो’ व्हिडीओ खोटा, हरिसाल गावच्या उपसरपंचाने केली पोलखोल

टीम महाराष्ट्र देशा : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी विदर्भातल्या हरिसाल या गावाबद्दलचं ‘वास्तव’ दाखवणारा व्हिडिओ त्यांच्या जाहीर सभेत नुकताच दाखवला होता. हा व्हिडिओ जाहीर सभेत दाखवत राज ठाकरे यांनी मोदी सरकारवर टीकास्त्र सोडले होते. पण या व्हिडिओत दाखवलेली बाजू चुकीची आहे आणि तो व्हिडिओच खोटा असल्याचा दावा हरिसाल गावातील लोकांनी केला आहे.

गाव डिजिटल आहे, हे सिद्ध करण्यासाठी उपसरपंचानं चक्क फेसबुक लाईव्ह करत डिजिटल रूम दाखवली आहे.त्यामुळे राज ठाकरे चांगलेच तोंडघशी पडले आहेत. राज ठाकरे यांनी आमच्या गावाविषयी राजकारण करु नये, अशी विनंती त्यांनी केली.

उपसरपंच गणेश महादेव येवले यांनी फेसबुक लाईव्हमध्ये नेमकं काय म्हटलं ?

आमच्या ‘डिजिटल व्हिलेज’ हरिसाल या गावात इंटरनेट व वायफायची सुविधा आहे. त्यामुळेच गावातील जिल्हापरिषदेच्या शाळेत ई-लर्निंगच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना डिजिटल शिक्षण दिले जात आहे. तर गावात महाराष्ट्र बँकेची शाखा आहे. त्या बँकेचे एटीएम सर्व नागरिकांकडे आहे. गावातील काही नागरिक एटीएमचा वापर करतात. गावातील मोठ्या दुकांनदाराकडे पॉस मशिन उपलब्ध आहे. त्याचा सुद्धा वापर सुरू आहे. या सर्व सुविधा गावात उपलब्ध आहे. सुरवातीच्या काळात या सुविधा आमच्या गावात नव्हत्या. त्यावेळी कुणीही आले नाही. सुविधा उपलब्ध करून दिल्या नाहीत. त्यामुळे राज ठाकरे यांनी आमच्या गावाच्या विकासाचे राजकारण करुन बदनामी करू नये, असे आवाहन त्यांनी केले. राज ठाकरे यांनी सभेत उभा केलेला मॉडेल तरुण आमच्या गावचा नागरिक नसल्याने त्यावर भाष्य करता येणार नाही, असेही ते म्हणाले.

अमरावती जिल्ह्यातल्या हरिसाल गावाबाबतचा व्हिडिओ राज ठाकरेंनी सभेमध्ये दाखवला होता. हा व्हिडिओ चुकीचा असल्याचा दावा च्या माध्यमातून केला आहे. राज ठाकरेंनी हरिसाल गावाची जी देशभरात बदनामी केली आहे. हरिसाल गावाविषयी जो व्हिडिओ दाखवला आहे, तो पूर्णपणे खोटा आहे.असं येवले म्हणाले. आज जर गावात इंटरनेट नसते तर आज मी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून तुमच्याशी संवाद साधू शकलो नसतो.अशा त्यांनी या लाईव्ह व्हिडिओतून व्यक्त केल्या आहेत.

आमच्या गावाच्या शाळेत काँप्युटर लॅब देण्यात आली आहे. येथे एचपी, माइक्रो सॉफ्ट, जल्दीफाय अशा कंपन्यांच्या मदतीने तंत्रज्ञान पोहोचले आहे. गावातील इंटरनेट व्यवस्थित काम करतंय, असेही त्यांनी यावेळी सांगितले. राज ठाकरे संपूर्ण महाराष्ट्रात हरिसालची बदनामी करत आहेत, त्यांनी केवळ राजकीय फायद्यासाठी हे केले आहे, असंही ते या व्हिडिओमध्ये त्यांनी म्हटलं आहे. यासबंधी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून अद्याप प्रतिक्रिया आलेली नाही.Loading…
Loading...