गोदापार्कच्या धर्तीवर मुळा-मुठेचा विकास शक्य- राज ठाकरे

raj thakrey

 

नाशिकमधील गोदापार्कच्या धर्तीवर पुण्यातील मुळा-मुठा नदीपात्राचा विकास आराखडा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज सादर केला आहे. नाशिकमधील नदी पात्रालगत केलेल्या कामाचा दाखला देत त्यांनी मुळा-मुठा नदीपात्राचा विकास शक्य असल्याचे मत यावेळी राज ठाकरे यांनी व्यक्त केले. या सादरीकरणावेळी पालकमंत्री गिरीश बापट, महापौर मुक्ता टिळक, महापालिका आयुक्त कुणाल कुमार, स्थायी समिती अध्यक्ष मुरूलीधर मोहोळ, विरोधी पक्षनेते चेतन तुपे आणि मनसेचे गटनेते वसंत मोरे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

शहराच्या विकास कामासाठी राज्य सरकारकडे पैसे नसतील मुंबई पुण्यातील काही उद्योजकांच्या सहकार्याने शहराचा विकास करणे शक्य असून उद्योजकांना या कामासंदर्भात विश्वासात घेणे गरजेचे असल्याचे राज ठाकरे म्हणाले. राज यांच्या संकल्पनेनुसार मुळा-मुठा नदीपात्र बालगंधर्व ते म्हात्रे पूलापर्यंत नदीपात्र विकास आराखडा तयार करण्यात आला आहे. नदीपात्र विकासाचा हा प्रकल्प तब्बल ८४० कोटींचा असून त्यातून दरवर्षी तीन कोटींचा महसूल मिळणार आहे. चित्रपटांप्रमाणे नाटकांसाठीही मल्टिप्लेक्स उभे करण्याचा मानस आहे. त्यामध्ये बालगंधर्व रंगमंदिरात प्रत्येकी हजार क्षमतेचे पाच नाट्यगृह, ५००० आसनक्षमतेचे ओपन थिएटर, १०० ते २०० आसनक्षमतेचे प्रायोगिक रंगकर्मींसाठी थिएटर अशा अद्ययावत सुविधा असतील.