… तर स्त्यावरचे नमाज बंद करा

राज ठाकरे

नवी मुंबई :  जर हिंदूंच्या सण उत्सवावर बंधने आणली जात असतील, तर हेच तत्व सर्व धर्मांना लागू करा. अशी मागणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली. ते पुढे बोलताना म्हणाले की, जर सार्वजनिक गणेशोत्सवावर बंधने लादली जात असतील तर, मग रस्त्यावरचे नमाज देखील बंद करा, मशिदीवरच्या भोंग्याची देखील आवशकता नसल्याचं राज ठाकरे यांनी म्हंटलं आहे.  ते नवी मुंबईत पार पडलेल्या मनसेच्या कामगार मेळाव्यात बोलतं होते.

पुढे बोलताना ते म्हणाले की, सरकारने मराठा आरक्षणाकडे दुर्लक्ष केल्यामुळे आंदोलन पेटले. मराठा आंदोलनात ७५०० मराठी मुलांवर ३०७ चे गुन्हे दाखल झाले आहे.या मुलाचं आयुष्य बरबाद झालं आहे. मराठा क्रांती मोर्चामध्ये उसळलेल्या हिंसाचाराला परप्रांतीय तरुण जबाबदार असून, बाहेरचे लोक ज्यांचा या आरक्षणाशी काहीही सबंध नाही. असे लोक आंदोलन भडकावत असल्याचा आरोप देखील यावेळी राज ठाकरे यांनी केला आहे.

महाराष्ट्र केंद्रातून चालतो मुख्यमंत्री तर केवळ सांगकामे – राज ठाकरे

खा.संजय काकडे यांनी घेतलेल्या दत्तक गावात बेसुमार वाळू उपसा ; प्रशासनाचे दुर्लक्ष.