नमाजाला भोंगे कशाला पाहिजे? घरीच नमाज पठण करा – राज ठाकरे

पुणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा कार्यकर्ता मेळावा आज पुण्यात पार पडला . या मेळाव्यात मनसे अध्यक्ष राज ठकरे यांनी भाषण करताना जाती धर्माच्या आधारे काही लोक जाणीवपूर्वक तेढ निर्माण करत असल्याच म्हंटलं आहे. ते पुढे बोलताना म्हणाले की, काही मुस्लिम धर्मीय लोक आपल्याकडे आले असतांना मी त्यांना हेच विचारलं की, नमाज पठण करण्यासाठी भोंग्याची काय आवश्यकता आहे. घरी बसून देखील नमाज पठण करता येऊ शकते.

पुढे बोलताना राज ठाकरे म्हणाले की,प्रत्येकाने आपला धर्म आपल्या घरापुरता मर्यादित ठेवला तर, समाजात तणाव निर्माण होणार नाही. यावेळी मराठा आरक्षणावर बोलताना राज ठाकरे म्हणाले की, , मराठा बांधवांनी या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की, सरकार कोणाचेही असुदेत सरकार फक्त समाजाच्या भावनेशी खेळण्याचं काम करत असत.

जातीय आरक्षणाच पाप हे माजी पंतप्रधान विश्वनाथ प्रतापसिंह यांच असल्याची टीका राज ठाकरे यांनी यावेळी केली. आधीचं सरकार असो की आत्ताच हे सर्व लोक मूळ परिस्थिती सांगायला तयार नाहीत, आरक्षण हे शिक्षण आणि सरकारी नौकरीसाठी हवं असत.आरक्षण हे आर्थिक निकषावर हवं. पुणे शहरात अनेक खासगी शैक्षणिक संस्था आहेत, किती तरी परप्रांतीय मुलं येथे शिक्षण घेतात, मग आमच्या मुलांनी कोठे शिकायचं, असा सवाल राज यांनी यावेळी उपस्थित केला.

मराठा आरक्षण : वाचा मुख्यमंत्र्यांनी बोलावलेल्या बैठकीत नेमकं काय झालं?

बाहेरचे लोक येऊन राज्यात दंगल घडवतात; मुख्यमंत्र्यांचे नाव न घेता जिग्नेश मेवाणीवर शरसंधान

You might also like
Comments
Loading...