fbpx

अमित ठाकरेंंचे लग्न ; राज ठाकरे यांनी मारली मोदी – शहांंच्या नावावर फुली

टीम महाराष्ट्र देशा : मनसे अध्यक्ष राज ठाकरे सध्या चिरंजीव अमित ठाकरे यांच्या लग्नाची निमंत्रण पत्रिका देण्यासाठी अनेक राजकीय नेत्यांच्या भेटी घेताना दिसत आहेत. राज ठाकरे यांनी राजकीय क्षेत्रातील अनेक मंडळीना निमंत्रण दिले पण पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांना अद्याप निमंत्रण दिलेल दिसत नाही.

अमित ठाकरे यांचा विवाह मिताली बोरुडेसोबत येत्या 27 जानेवारीला संपन्न होणार आहे. या शुभ कार्याप्रसंगी अनेक राजकीय मंडळी मांडवात हजेरी लावणार असल्याच सांगितल जात आहे. राजकीय मंडळींबरोबरच उद्योगपती तसेच चित्रपट सृष्टीतले, क्रीडा क्षेत्रातले अनेक मान्यवर देखील उपस्थित राहणार आहेत. पण अमित शहा आणि नरेंद्र मोदी मात्र अनुपस्थित राहणार असल्याच कळतंय कारण राज ठाकरे यांनी अजून अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांना निमंत्रण पत्रिका दिले नसल्याची चर्चा आहे.

याआधी राज ठाकरे यांना नाशिक दौऱ्यावर असताना पत्रकारांनी नरेंद्र मोदी यांना निमंत्रण देणार का असा प्रश्न केला होता पण त्यावर राज यांनी मोदींचा लग्नावर विश्वास आहे का ? असा मिश्कील प्रश्न विचारला होता.