महाराष्ट्र केंद्रातून चालतो मुख्यमंत्री तर केवळ सांगकामे – राज ठाकरे

पुणे : राज्याचे मुख्यमंत्री केवळ सांगकामे आहेत, महाराष्ट्र केंद्रातून चालवला जातो म्हणत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर निशाणा साधला आहे. पुण्यामध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी राज ठाकरे यांनी छत्रपती शिवाजी महाराज स्मारक ते नीट परिक्षेसंदर्भासारख्या वेगवेगळ्या मुद्यांवरून सरकारला धारेवर धरलं आहे.

वैद्यकीय शिक्षणासाठी सर्वात आधी राज्यातील विद्यार्थ्यांना प्राधान्य देण्यात यावं, नीटच्या प्रवेशावर राज्यसरकार नीट लक्ष देत नाही. परराज्यातील मुले इथे घुसवायची असल्यानेच असं केलं जातं आहे. बाहेरील मुलांना प्रवेश दिले जात असतील तर मग आपल्या राज्यातील मुलांनी कुठे जायचं असा सवाल यावेळी राज ठाकरे यांनी उपस्थित केला.

नीटप्रमाणेच दुधाचे आंदोलन हाताळण्यात देखील राज्यसरकार अपयशी ठरले आहे. जर आंदोलन होणार आहे हे आधी माहीत होतं, तर आंदोलकांची बैठक बोलवायला हवी होती. मात्र, बाहेरील राज्यातील दूध उत्पादन आपल्या राज्यात घुसवण्यासाठी ते केलं जातं असल्याची टीका यावेळी राज ठाकरे यांनी केली.

दरम्यान, राम मंदीर हे झालं पाहिजे पण याला निवडणुकीचा मुद्दा बनवू नये, चार वर्षातला विकास दाखवता  येत नाही, म्हणून भगवत गीता वाटणे आणि राम मंदिराचा मुद्दा पूढे केला जात असल्याचा आरोप राज ठाकरे यांनी यावेळी केला आहे. तसेच आजवर अनेक कारसेवक मारले गेले, पण आता बहुमताचे सरकार असतानाही मंदिर बांधले जात नसल्याचं म्हणत त्यांनी भाजपवर निशाणा साधला.

पोलिसांनी बळाचा वापर केला, तर सहन करणार नाही – राजू शेट्टी

जर सरकारला खड्डे दिसत नसतील, तर आंदोलन दिसेल – राज ठाकरे