४० जवानांच्या बलिदानाला राजकीय खेळी म्हणणाऱ्या राज ठाकरेंनी भारतीय वायूसेनेचे केले कौतुक

टीम महाराष्ट्र देशा : पुलवामा हल्याचा बदला आज भारतीय सैन्याने घेतला आहे. पाक व्याप्त काश्मीर मध्ये घुसून भारतीय वायूसेनेने मिराज 2000 या ताकदवान विमानांच्या साहायाने ‘जैश ए मोहमद’ च्या तळांचा वेद घेऊन बॉम्ब हल्ला केला. यामध्ये अनेक दहशतवादी मृत्यूमुखी पडले आहेत. या दिलेल्या चोख उत्तरामुळे देशात सर्वत्र भारतीय वायुसेनेचे कौतुक केले जात आहे. तर आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील भारतीय वायुसेनेचे कौतुक केले आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या अधिकृत ट्वीटर अकाऊंट वरून भारतीय हवाई दलाने ज्या पद्धतीने अतिरेक्यांचे तळ उध्वस्त केले, त्या बद्दल मी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे भारतीय हवाई दलाचं मनापासून अभिनंदन करतो, असे ट्वीट केले आहे.

दरम्यान कोल्हापूर येथे बोलताना राज ठाकरे यांनी पुलवामा येथे झालेला हल्ला हा राजकीय खेळी असल्याचे भाष्य केले होते. त्यामुळे राज ठाकरे यांना सोशल मिडीयावर चांगलेच ट्रोल करण्यात आले होते.