निवडणुकीच्या रिंगणात नसतानाही मनसेचं इंजिन धावणार

टीम महाराष्ट्र देशा : लोकसभा निवडणुकीच्या रिंगणातून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काढता पाय घेतला असला तरी राज ठाकरे राज्यातल्या प्रमुख मतदार संघांमध्ये जावून पंतप्रधान मोदी यांच्या विरोधात प्रचार करणार आहेत, अशी माहिती समोर येत आहे. त्यामुळे राज ठाकरे यांच्या या प्रचारसभांचा फायदा राज्यातील कॉंग्रेस आघाडीला होणार आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी या लोकसभा निवडणुकीत न उतरता भाजप विरोधात प्रचार करणार असल्याचे ठरवले आहे. त्यामुळे राज ठाकरे कॉंग्रेस किंवा राष्ट्रवादी यांच्या मंचावर न जाता मनसेच्या मंचावरूनचं जावून जनतेला मोदींन विरोधात संबोधित करणार आहेत. राज ठाकरे राज्यातील प्रमुख मतदार संघांमध्ये जावून म्हणजेच नाशिक , औरंगाबाद, नंदेड, मावळ, सोलापूर , उत्तर मुंबई , उत्तर मध्य मुंबई , ईशान्य मुंबई येथे जावून आपल्या सभा घेणार आहेत.

दरम्यान या निवडणुकीमध्ये राज ठाकरे यांना महाआघाडीत जाण्याची इच्छा होती. यावर महाआघाडीत घेण्यासाठी राष्ट्रवादीने तयारी देखील दाखवली होती मात्र मनसेला महाआघाडीत घेण्यास कॉंग्रेस पक्ष हा काही तयार नव्हता. परिणामी राज ठाकरे यांना महाआघाडीत जागा मिळाली नाही.परंतु महाआघाडीत जागा मिळाली नसली तरी राज ठाकरे यांनी घेतलेल्या मोदी विरोधी भूमिकेतून ते प्रत्यक्षरित्या आघाडीलाचं मदत करणार आहेत.