माझ्या हातात एकदा सत्ता देऊन पहा – राज ठाकरे

टीम महाराष्ट्र देशा- दुसऱ्यांच्या आंदोलनाला स्वत:चं आंदोलनं म्हणणं मला मान्य नाही. तेव्हा मी तुमचं दर्शन घ्यायला येथे आलो आहे .शेतकऱ्यांनो तुमच्या आंदोलनाला माझा आपला पूर्ण पाठिंबा आहे . या सरकारच्या हातून तुमच्या मागण्या पूर्ण होणार नाहीत . तुम्ही माझ्याकडे वीस मागण्या केल्या आहेत . मीही तुमच्याकडे एक मागणी करतो . माझ्या हातात एकदा सत्ता देऊन पहा असे आवाहन मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सोमय्या मैदानावर शेतकरी मोर्चात सहभागी शेतकऱ्यांसमोर बोलताना केले .

दरम्यान नाशिकमधून निघालेले लाल वादळ म्हणजेच शेतकरी, शेतमजूर, कष्टकऱ्यांचा लाँग मार्च आज पहाटेच्या सुमारास मुंबईतील आझाद मैदानावर दाखल झाला आहे. सामान्य मुंबईकर तसेच परीक्षार्थी विद्यार्थ्यांची गैरसोय होवू नये यासाठी पहाटेच लाँग मार्च आझाद मैदानावर आला.

bagdure

सर्व शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी, शेतमालाला भाव, वनजमिनींचं हस्तांतरण अशा मागण्यांसाठी निघालेले शेतकरी आज विधानसभेला घेराव घालणार आहेत. सरकारने देखील उशिरा का होईना मंत्री गटाची स्थापना करत शेतकरी आंदोलकांशी बोलण्याची तयारी दर्शवली आहे. दरम्यान, आता गोळ्या झाडल्या तरी लेखी आश्वासन मिळेपर्यंत माघार नसल्याचा निर्धार शेतकऱ्यांनी व्यक्त केला आहे.

दुपारी दोनच्या सुमारास मंत्री गट आणि आंदोलकांची चर्चा होणार असल्याची माहिती मिळत आहे. आझाद मैदानावर लौंग मार्च पोहोचल्यानंतर अनेक सामाजिक संघटना, मुस्लीम, शीख बांधवानी शेतकऱ्यांना पाणी, बिस्किटांचं वाटप केल. तर मुंबईकरांनी देखील मदतीचा हात पुढे केला आहे.आज संध्याकाळी कम्युनिस्ट पार्टीचे नेते खासदार सीताराम येचुरी आणि ऑल इंडिया किसान सभेचे अध्यक्ष आमरा राम सभेला संबोधित करणार आहेत

You might also like
Comments
Loading...