fbpx

मराठी माणसाने डीएसकेंच्या पाठीशी उभं रहावं – राज ठाकरे

raj supports dsk

पुणे – काही अमराठी व्यावसायिक डीएसकेंना संपवायला निघाले आहेत. मात्र मराठी माणसाने मराठी व्यावसायिकांच्या माघे उभारं राहणे गरजेचे आहे. डीएसके फसवणारे उद्योजक नाहीत. पण सध्या ते अडचणीत आहेत अशा वेळी आपण त्यांना पाठिंबा देत गरजेचं आहे.

शून्यातून विश्व निर्माण करणारे पुण्यातील प्रसिध्द बांधकाम व्यावसायिक डी एस कुलकर्णी हे सध्या आर्थिक अडचणींचा सामना करत आहेत. हजारो गुंतवणूकदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप डीएसकेंवर करण्यात आले आहेत. तसेच या प्रकरणी त्यांच्या विरोधात गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे. दरम्यान मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे आज डीएसकेंच्या गुंतवणूकदारांशी चर्चा केली. त्यामुळे डबघाईला आलेल्या मराठी व्यावसायिकाच्या मदतीला राज ठाकरे धावून आल्याची चर्चा सध्या पुण्यामध्ये रंगली आहे.

‘आय सपोर्ट डीएसके’ असे या चर्चेला नाव देण्यात आले असून लॉ कॉलेज रोडवरील दरोडे सभागृहात सध्या ही चर्चा सुरू आहे. डीएसकेंवर पुणे, मुंबई आणि कोल्हापुर येथे गुंतवणुकदारांच्या हिताचे संरक्षण अधिनियमाखाली गुन्हे दाखल झाले आहेत. सुमारे ३५०० एफडी धारकांनी आपल्या तक्रारी आर्थिक गुन्हे शाखेकडे दाखल केल्या आहेत. गुंतवणूकदारांचे सुमारे २०० कोटी रुपये या प्रकरणात अडकले आहेत.