अमित ठाकरेंचा उद्या साखरपुडा ;जाणून घ्या कोण होणार राज ठाकरेंच्या सुनबाई

मुंबई : अमित ठाकरे यांचा उद्या सोमवारी साखरपुडा होतोय. अमित हा राज ठाकरे यांचा मुलगा असून फॅशन डिझायनर मिताली बोरुडेशी अमितचा साखरपुडा होतोय. अशी माहिती सूत्रांकडून कळतेय. विशेष म्हणजे राज ठाकरे यांचा 11 डिसेंबर हा लग्नाचा वाढदिवस आणि याच दिवशी अमितचा साखरपुडा होतोय. मुंबईतच अगदी खाजगी स्वरूपात होणार आहे.अमित आणि मिताली यांची मैत्री खूप जुनी आहे. आणि आता त्या मैत्रीचं रूपांतर सुंदर नात्यात होतंय.एकूणच राजकारणी आणि त्यांच्या आयुष्यातल्या घडामोडींबद्दल जनतेला नेहमीच उत्सुकता आहे. शिवाय अमित नुकताच मोठ्या आजारातून बरा झालाय, त्यामुळे या बातमीनं सगळ्यांनाच आनंद झालाय.