“भाजप बलात्काऱ्यांना पाठीशी घालतोय”

टीम महाराष्ट्र देशा- पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपवरही राज ठाकरेंनी कडक टीका केली. जम्मू आणि काश्मीरमध्ये 8 वर्षांच्या मुलीवर बलात्कार केला जातो आणि भाजपचे नेते आरोपींना पाठीशी घालतात असा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी केला आहे. मुंबईतील मुलुंडमध्ये मनसेच्या वतीने 100 महिलांना रोजगाराचं साधन म्हणून रिक्षांचं वाटप करण्यात आलं. यावेळी झालेल्या सभेत राज ठाकरेंनी अनेक मुद्द्यांवरुन सरकारवर निशाणा साधला. जम्मू-काश्मीरमधील आसिफा बलात्कार प्रकरणावरुनही त्यांनी भाजपवर गंभीर आरोप केला.

नाणार प्रकल्पावरून देखील राज ठाकरे यांनी भाजपवर निशाना साधला.कोकणाची वाट लावणारा ‘नाणार’चा प्रकल्प कुठल्याही परिस्थितीत होऊ देणार नाही असा इशारा मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिला. हा प्रकल्प गुजरातला जाईल असं मुख्यमंत्री म्हणताहेत, हा प्रकल्प गुजरातला न्या किंवा चंद्रावर न्या आम्हाला देणंघेणं नाही असंही ते म्हणाले.

रिफायनरी प्रकल्प न होऊ देण्यासाठी काही दिवसांपूर्वीच नाणारवासियांनी राज ठाकरेंची भेट घेतली होती.’नाणार प्रकल्प कोकणात होणार नाही म्हणजे नाही. हा प्रकल्प महाराष्ट्रात झाला नाही, तर गुजरातला जाईल,” अशी भीती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दाखवतात. मात्र, गुजरातच का, असा सवाल करत प्रकल्प कुठेही न्या, पण तो कोकणात होणार नाही, राज्य सरकारला काय करायचं ते करावं, असं जाहीर आव्हान राज ठाकरेंनी दिलं.

You might also like
Comments
Loading...