fbpx

पार्थसाठी मावळात राज गर्जना, मावळात धडाडणार राज ठाकरेंची तोफ

टीम महाराष्ट्र देशा : यंदाच्या लोकसभा निवडणुकी मध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने प्रत्यक्ष निवडणुकीच्या रिंगणात न उतरता मोदी आणि भाजप विरोधात जोरदार प्रचार करणार असल्याची भूमिका घेतली आहे. त्याच पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे पार्थ पवार यांचा किल्ला लढवण्यासाठी मावळमध्ये सभा घेणार असल्याची माहिती खुद्द अजित पवार यांनी पनवेलमध्ये बोलताना दिली आहे.

यंदाच्या निवडणुकीत मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप पक्ष विरोधात जोरदार प्रचार करत आहेत. त्यामुळे त्याचा फायदा प्रत्यक्षरित्या कॉंग्रेस आघाडीला होणार असल्याच दिसत आहे. त्यामुळे पार्थ पवार यांच्या मावळ लोकसभा मतदार संघात देखील मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे मोदी विरोधी प्रचार सभा घेणार आहेत.

राज्यभरात राज ठाकरे हे जवळपास 8 ते 10 सभा घेणार असून त्यातील एक सभा मावळमध्ये होणार आहे. त्यामुळे सर्वांनी एकत्र येवून येत्या 20 दिवसात मनापासून आपणच स्वतः उमेदवार आहोत असं समजून काम करा व पार्थ पवार यांना निवडून द्या, असे भावनिक आवाहन अजित पवार यांनी केले आहे.

दरम्यान मावळ लोकसभा मतदार संघातून कॉंग्रेस आघाडीकडून राष्ट्रवादीचे उमेदवार पार्थ पवार रिंगणात आहेत तर त्यांच्या विरोधात युतीचे उमेदवार म्हणून शिवसेनेचे विद्यमान खासदार श्रीरंग बारणे लढणार आहेत. त्यामुळे मावळ लोकसभा मतदार संघात पार्थ पवार यांना निवडणून आणण्यासाठी राज ठाकरे प्रचार सभा घेणार आहेत.