पप्पू आता परमपूज्य – राज ठाकरे

टीम महाराष्ट्र देशा – आज जाहीर झालेल्या पाच राज्यांमधील निकाल काँग्रेसच्या बाजूने आहेत. देशात नरेंद्र मोदी आणि भाजपाची वागणूक जशी होती त्यामुळे हे होणारच होतं. त्यामुळे मी पाच राज्यातील जनतेचं अभिनंदन करतो, पण त्यासोबत गुजरातच्या जनतेचे देखील अभिनंदन करतो अशी प्रतिक्रिया राज ठाकरे यांनी दिली आहे.

या राज्यातील निकाल कॉंग्रेसच्या बाजूने लागल्यामुळे पप्पू आता परमपूज्य झाला, अशा शब्दांत मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी काँग्रेसचे कौतुक केले आहे. तर हा पूर्णपणे राहुल गांधींचा विजय आहे. गुजरातमध्येही त्यांनी एकहाती प्रचार केला होता.असेही राज ठाकरे त्यावेळी म्हणाले.

भाजपच्या पराभवामुळे शिवसेनेचा आनंद गगनात मावेना, भाजपला दिला आत्मपरीक्षणाचा सल्ला