fbpx

लोकसभा निवडणुकांनंतर राज ठाकरेंची तोफ पुन्हा धडाडणार, १० तारखेपासून दुष्काळी दौरा

raj thakare

टीम महाराष्ट्र देशा : संपूर्ण देशात लोकसभा निवडणुकांचे वारे वाहत असताना राज्याचा दौरा करत मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी भाजपविरोधात प्रचारसभा घेतल्या होत्या. आणि आता राज ठाकरे हे अजून एक महाराष्ट्र दौरा करणार आहेत. त्यामुळे मनसे आता विधानसभेच्या तयारीला लागल्याचं चित्र दिसतंय.

राज्यात पडलेला दुष्काळ हा अतिशय भीषण आहे याचा आढावा घेण्यासाठी राज ठाकरे पुढच्या आठवड्यात १० तारखेपासून महाराष्ट्र दौऱ्याला सुरुवात करत आहेत. या दौऱ्यात मराठवाडा, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रातील दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेतला जाईल. ग्रामीण भागामध्ये सध्या पिण्यासाठी पाणी नाही, लोकांना चारा छावण्यांवर राहून जनावरांची काळजी घ्यावी लागत आहे. या सर्व परिस्थितीचा आढावा घेण्यात येणार आहे. तसेच मनसेच्या तळागाळातल्या कार्यकर्त्यांना भेटण्याचा प्रयत्न राज ठाकरे करणार आहेत. त्यामुळे मनसेने आता विधानसभेची तयारी सुरु केल्याचं दिसतंय.

दरम्यान, लोकसभा निवडणुका न लढवत राज ठाकरेंनी भाजपविरोधात प्रचार केला होता. त्यामुळे मनसेला विधानसभा निवडणुकीत फायदा होण्याची शक्यता आहे.