राज ठाकरे हे बाळासाहेब ठाकरेंचे पुतणे, त्यांना स्क्रिप्टची गरज नाही : अजित पवार

अजित पवार

टीम महाराष्ट्र देशा : राज ठाकरे यांनी जरी लोकसभा निवडणुकीतून माघार घेतली असली तरी ते मोदी सरकार विरोधात प्रचार करत आहेत. त्यामुळे कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीला फायदा होत आहे. राज ठाकरे यांच्या या भूमिकेवर भाजपने जोरदार टीका केली होती. त्या टीकेला अजित पवार यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

अजित पवार यांनी ‘राज हे बाळासाहेब यांचे पुतणे असून त्यांना कशाला स्क्रिप्ट लिहून द्यावी लागतेय’ असे म्हणत भाजपला टोला लगावला आहे. २०१४ च्या निवडणुकीत राज ठाकरे जेव्हा भाजपच्या बाजूने बोलत होते, तेव्हा भाजपच्या नेत्यांना बरं वाटत होतं. परंतु आता ते विरोधात बोलत आहेत तेव्हा विनोद तावडे पोपटासारखे बोलायला लागले आहेत, त्यांच्यावर टीका करू लागले आहेत असंही अजित पवार पुढे बोलताना म्हणाले.

दरम्यान, ‘राहुल गांधी हे पंतप्रधान म्हणून शरद पवारांना चालतील का, हे आधी शरद पवारांना विचाराव, अन्यथा राज यांना पुढच्या स्क्रिप्ट मिळणार नाहीत, अशा शब्दात विनोद तावडे यांनी राज यांच्यावर टीका केली होती.