राज ठाकरेंचे आता उद्धव ठाकरेंना फटकारे

raj-thackeray

टीम महाराष्ट्र देशा : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रीय कार्यकारणीच्या बैठकीत आगामी निवडणुका स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच अनेक वेळा शिवसेनेने  भाजपला सत्तेतून बाहेर पडण्याची पोकळ धमकी दिली आहे. त्यामुळे विरोधकांनी शिवसेनेवर टीका केली आहे. शिवसेना सत्तेसाठी लाचार आहे. असा आरोप काहीदिवसांपूर्वी राष्ट्रवादी नेते अजित पवार यांनी केली होती. आता राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे व्यंग्यचित्र काढत उद्धव ठाकरेंना चांगलेच फटकारे मारले. आपल्या फेसबूक अकाऊंटवर राज ठाकरे यांनी शिवसेनेच्या स्वबळावर लढण्याच्या घोषणेच्या निर्णयाची खिल्ली उडवणारं व्यंगचित्र टाकलं आहे, ज्याला सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी भरभरुन प्रतिसाद दिला आहे.

raj thakare

राज ठाकरे यांनी काढलेल्या व्यंग्यचित्रात उद्धव ठाकरे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पोटावर बसले असून देवेंद्र फडणवीस यांची नकारात्मक भूमिका स्पष्ट होत आहे. म्हणजे शिवसेनेने युती तोडली तरी भाजप ला फरक पडत नसल्याचे व्यंग्यचित्रातून दिसत आहे. शिवसेनेच्या सत्तेवर लाथ मारण्याच्या घोषणेला नाटकाची उपमा दिली आहे. या व्यंगचित्रात उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पोटावर बसून सत्ता सोडू का? अशी धमकी देताना दाखवले आहेत.