fbpx

मोदी-शहांनी दादागिरी केली, मग ममतांनी केली तर काय फरक पडतो : राज ठाकरे

टीम महाराष्ट्र देशा : लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान पश्चिम बंगालमध्ये हिंसाचार झाला होता. भाजपने यासाठी तृणमूल कॉंग्रेसच्या अध्यक्ष आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना जबाबदार धरले होते. तसेच ममतांनी बंगालमध्ये दादागिरी केली असा आरोप ममता बॅनर्जी यांच्यावर केला होता.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी यावर बोलताना ‘पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी जे करत आहेत ते योग्यच आहे. आजवर मोदी आणि अमित शाह यांनी दादागिरीच केली आहे. मग ममतांनी केली तर बिघडलं कुठे? अमित शाहांना कळू दे दादागिरी काय असते ते. कोलकात्यातील रॅली अर्धी सोडून पळून आले. यांच्या बाबतीत हेच पाहिजे होतं, असं राज ठाकरे म्हणाले.

दरम्यान, शुक्रवारी झालेल्या पत्रकार परिषदेवरून राज ठाकरे यांनी ट्विट करत मोदींवर निशाणा साधला आहे. “पंतप्रधानांची पत्रकार परिषद…मौन की बात”,असे ट्विट करत त्यांच्या काहीच न बोलण्यावर टीका केली आहे.