गणेशोत्सवाचे जनक कोण हा वाद म्हणजे निव्वळ मूर्खपणा:ठाकरे

टिळकांच योगदान नाकारणार का? राज ठाकरे

पुणे : गणेशोत्सवाचे जनक कोण, यावरून पुण्यातील वाद टोकाला गेला असून हा प्रश्न आता राजकीय मुद्दा बनू लागला आहे.हा वाद म्हणजे निव्वळ मूर्खपणा असल्याचं मत व्यक्त करत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी या वादात उडी घेतली आहे.
मनसेच्या पदाधिकारी बैठकीसाठी राज ठाकरे पुण्यामध्ये आले होते.यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला . पुण्यामध्ये सध्या गणेशोत्सवाचे जनक कोण यावरून चांगलच वातावरण तापलं आहे. २० आॅगस्ट पासून बेमुदत उपोषण करण्याचा इशाराही भाऊसाहेेेब रंगारी ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे.आ.नितेश राणे आंदोलनाला पाठिंबा देणार आहेत.
या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांना त्याचं मत विचारलंअसता राज ठाकरे यांनी आपली भूमिका मांडली. गणेत्सवाचे जनक कोण हा वाद म्हणजे निव्वळ मूर्खपणाअसल्याच त्यांनी सांगितल तसेच आतापर्यंत फक्त महापुरुष जातीमध्ये विभागले जात होते मात्र आता देव देखील जातींमध्ये विभागले जात असल्याची टीका राज ठाकरे यांनी केल आहे. लोकमान्य टिळक यांनी केलेलं कार्य तसेच उत्सवाला सावर्जनिक करण्यात दिलेलं योगदान आपण नाकारणार आहोत का ?असा सवाल देखील ठाकरे यांनी उपस्थित केला .