ईव्हीएमचा वाद : मॅचफिक्स असेल, तर सामने खेळून काय फायदा?

टीम महाराष्ट्र देशा : मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज दिल्लीत मुख्य निवडणूक आयुक्तांची भेट घेतली आहे. यात ईव्हीएमविषयी राज ठाकरे यांनी आयुक्तांसमोर आपली भूमिका मांडली. या भेटीनंतर राज ठाकरे यांनी ‘मॅचफिक्स असेल, तर सामने खेळून काय फायदा? अस विधान केले आहे.

मुख्य निवडणूक आयुक्तांची भेट घेतल्यानंतर राज ठाकरे यांनी जनतेचा प्रतिनिधी म्हणून ईव्हीएमविरोधात निवडणूक आयुक्तांची भेट घेतली आहे. ईव्हीएमसंबंधी ठाकरे यांनी आयुक्तांशी चर्चा केली असल्याचे सांगितले. तसेच पुढे बोलताना घोडेबाजार किती दिवस चालणार? मॅचफिक्स असेल, तर सामने खेळून काय फायदा? पत्रकारच म्हणत आहेत, की भाजप हा घोडेबाजार करत आहेत; मग असेल!, असे राज ठाकरे यांनी म्हटले आहे.

दरम्यान, लोकसभा निवडणुकीच्या काळात कॉंग्रेस आणि इतर २१ विरोधी पक्षांनी ईव्हीएमविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार केली होती. तरीही निवडणूक आयोगाने त्यांच्याकडे दुर्लक्ष केले होते.