आता तरी खात्री पटली का व्यंगचित्र मीच रेखाटतो – राज ठाकरे

पुणे : विश्वकर्मा ग्रुप आणि युवा स्पंदन ग्रुप यांच्या तर्फे पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिराच्या कलादालनात चित्रांचं प्रदर्शन आयोजित करण्यात आलं आहे. याचं उदघाटन राज ठाकरे यांच्या हस्ते झालं. यावेळी राज ठाकरे यांनी अटल बिहारी वाजपेयी यांचं चित्र रेखाटलं. त्यानंतर राज ठाकरे यांनी आता तरी खात्री पटली का व्यंगचित्र मीच काढतो अस म्हणताच सभागृहात एकच हशा पिकला.

नवोदित कलाकारांना आपली कला दाखवण्यासाठी अधिक संधी मिळण्याचीही गरज त्यांनी व्यक्त केली. त्याचसोबत जेजे स्कुलमध्ये असताचे किस्साही त्यांनी सांगितला. खाली बसून काम करण्याची सवय असल्यामुळे मी असायनमेंट घरी जाऊनच करायचो. कामाचा भाग घरी आणि आनंदाचा भाग कोलेजमध्ये जाऊन पूर्ण करायचो असं त्यांनी सांगितलं.

…हे खरंच पंतप्रधान पदाचे उमेदवार आहेत का? भाजप प्रवक्त्याचा पलटवार