राज ठाकरेंनी बोलावली पदाधिकाऱ्यांची बैठक; मनसे निवडणूक लढवणार ?

raj thakrey

टीम महाराष्ट्र देशा : विधानसभा निवडणुका या तोंडावर येवून ठेपल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर सर्व पक्षाची जागा वाटपाबाबत चर्चा सुरू आहे. मात्र येणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी मनसेने कोणतीही भूमिका अजून स्पष्ट केलेली नाही. आज मनसेची विधानसभा निवडणुकी संदर्भातील भूमिका स्पष्ट होण्याची शक्यता आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांची तातडीने बैठक बोलावली आहे. या बैठकीतून काय निर्णय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्यात विधानसभा निवद्निक लढवण्याविषयी मनसेमध्ये संभ्रम आहेत. याविषयी चर्चा होऊन अंतिम निर्णय आज होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या बैठकीला विशेष महत्व प्राप्त झाले आहे.

दरम्यान, मनसेने लोकसभा निवडणूक लढवली नव्हती. तरीही राज ठाकरेंनी राज्यभरात भाजपच्या विरोधात प्रचार केला होता. परंतु त्यांच्या प्रचाराचा फारसा फायदा आघाडीला झाला नाही त्यामुळे ते आता विधानसभा निवडणुकीत काय भूमिका घेणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागलेले आहे. काही दिवसांपूर्वीच मनसेत विधानसभा निवडणूकही न लढण्याचा सूर पाहायला मिळाल्याची माहिती समोर आली होती.

आज होणाऱ्या बैठकीत पक्षाची आगामी निवणुकीच्या दृष्टीने तसेच पक्षाच्या भविष्याच्या दृष्टीने महत्वाचा निर्णय होण्याची शक्यता आहे. राज ठाकरेंनी ज्याप्रमाणे लोकसभा निवडणुकीत भाजपविरोधी भूमिका घेतली होती. त्यामुळे ते कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीबरोबर आघाडी करण्याची शक्यता होती. परंतु त्यांना कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीने आघाडीत घेतलेले नाही.