राज ठाकरे धावले मराठी व्यावसायिकाच्या मदतीला

mns

पुणे: शून्यातून विश्व निर्माण करणारे पुण्यातील प्रसिध्द बांधकाम व्यावसायिक  डी. एस. कुलकर्णी हे सध्या आर्थिक अडचणींचा सामना करत आहेत. हजारो गुंतवणूकदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप डीएसकेंवर करण्यात आले आहेत. तसेच या प्रकरणी त्यांच्या विरोधात गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे. दरम्यान मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे आज डीएसकेंच्या गुंतवणूकदारांशी चर्चा करणार आहेत. त्यामुळे डबघाईला आलेल्या मराठी व्यावसायिकाच्या मदतीला राज ठाकरे धावून आल्याची चर्चा सध्या पुण्यामध्ये रंगली आहे.

‘आय सपोर्ट डीएसके’ असे या चर्चेला नाव देण्यात आले असून लॉ कॉलेज रोडवरील दरोडे सभागृहात सध्या ही चर्चा सुरू आहे. डीएसकेंवर पुणे, मुंबई आणि कोल्हापुर येथे गुंतवणुकदारांच्या हिताचे संरक्षण अधिनियमाखाली गुन्हे दाखल झाले आहेत. सुमारे ३५०० एफडी धारकांनी आपल्या तक्रारी आर्थिक गुन्हे शाखेकडे दाखल केल्या आहेत. गुंतवणूकदारांचे सुमारे २०० कोटी रुपये या प्रकरणात अडकले आहेत.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

आमची 'आरती ' त्रास देत नाही ; तर तुमच्या ' नमाज ' चा त्रास कसा सहन करणार
अधिवेशन सुरु असतानाच मनसेला मोठा धक्का,'या' बड्या नेत्याने केला राष्ट्रवादीत प्रवेश
पवारांना सतावतेय पाकिस्तानातील मुस्लिमांची चिंता,म्हणाले....
'हिंसक वळण लावणारे, तोडफोड करणारे कार्यकर्ते हे वंचित बहुजन आघाडीचे नाहीत'
...तर भाजप - मनसे एकत्र येऊ शकतात; पाटलांनी दिले युतीचे संकेत
'एमआयएम'ने आजपर्यंत सगळ्यांनाच शिंगावर घेतलयं, मनसेला घाबरत नाही
जावयाला अडचण झाली तर मुलीलाही अडचण होणार हे लक्षात असुद्या - शिवेंद्रराजे भोसले
मनसेच्या संघटना बांधणीची जबाबदारी बारामतीकराच्या खांद्यावर
'देवेंद्र फडणवीस जगातील सर्वांत खोटारडे नेते'
शरद पवार सुरक्षा काढून घेतली ही अफवा,यामध्ये काही तथ्य नाही : अमृता फडणवीस