राज ठाकरेंनी फेसबुक पोस्टद्वारे साधला फेरीवाल्यांवर निशाना

Screenshot (2) wakola

मुंबई : वाकोला भागातील फेरीवाले भाज्या आणि फळं गटारीत लपवत असल्याचा व्हिडीओ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष यांनी आपल्या फेसबुक पेजवर पोस्ट केला आहे.राज ठाकरेंनी फेसबुक पोस्टद्वारे साधला फेरीवाल्यांवर निशाना आहे . दरम्यान या भागात बसणाऱ्या फेरीवाल्यांचा माल पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी जप्त केला आहे. तसेच या फेरीवाल्यांवर गुन्हाही दाखल करण्यात येणार असल्याचं पालिकेकडून सांगण्यात येत आहे.

हा सर्व प्रकार मागील तीन महिन्यापासून सुरु होता. अखेर सोशल मीडियावर या धक्कादायक प्रकाराचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर ही संपूर्ण घटना समोर आली . या भागात फेरीवाल्यांना बसण्यास परवानगी नसल्याने कारवाई टाळण्यासाठी वाकोल्यातील फेरीवाले फळ-भाज्यांच्या पेट्या चक्क गटारात लपवायचे. पालिकेची गाडी येण्याआधी फेरीवाले आपल्या भाज्या इतर माल या गटारीत लपवून पसार व्हायचे.

1 Comment

Click here to post a comment