‘हा निर्णय ऐकायला आज बाळासाहेब हवे होते’

blank

टीम महाराष्ट्र देशा : गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित असलेला आयोध्या रामजन्मभूमी आणि बाबरी मस्जिद खटला प्रकरणी आज अंतिम निर्णयाचे वाचन करण्यात आले आहे. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश रंजन गोगाई यांचे खंडपीठ सकाळी साडेदहा वाजल्यापासून या खटल्याल्याच्या निर्णयाचे वाचन करीत होते.

या निर्णयानंतर देशभरातून प्रतिक्रिया येत आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखिल न्यायालयाच्या निकालावर “सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निकाल महत्त्वपूर्ण आहे. या निकालामुळे मला खूप आनंद झाला आहे. आता लवकरात लवकर राम मंदिर देखील बांधलं जावं. पण यावेळी फक्त एकच वाटतं, यावेळी बाळासाहेब ठाकरे असायला हवे होते” अशी प्रतिक्रिया दिली आहे.

सगळ्या देशाचं लक्ष लागलेल्या अयोध्या प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयाने ऐतिहासिक असा निर्णय दिला आहे. आज सर्वोच्च न्यायालयाने अयोध्येच्या प्रलंबित खटल्यावर निकाल दिला आहे. राम लल्लाच्या बाजूने देण्यात आलेल्या या निर्णयामध्ये मुस्लिम समुदायासाठीसुद्धा पाच एकर जमीन देण्यात यावेत असे आदेश केंद्र सरकार आणि राज्य सरकारला दिले आहेत.

महत्वाच्या बातम्या