fbpx

राज ठाकरे यांची स्वातंत्र्यवीर सावरकरांना मानवंदना

मुंबई – आज स्वातंत्र्यवीर विनायक दामोधर सावरकर यांची जयंती असून सावरकर यांच्या जयंतीनिमित्त सर्व पक्षातील नेत्यांकडून त्यांना मानवंदना देण्यात येतीये. मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी सावरकरांच्या स्मृतीस अभिवादन करत. “हिंदू राष्ट्रवाद मांडणारे तत्वज्ञ, क्रांतिवीरांचे सेनापती, विज्ञाननिष्ठा व राष्ट्राची शस्त्रसज्जता ह्या विषयी विचार मांडणारे, प्रखर राष्ट्राभिमानी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर ह्यांच्या स्मृतीस माझं विनम्र अभिवादन,” या शब्दांमध्ये त्यांना मानवंदना दिली.

तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील सावरकरांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून, ज्वाजल्य राष्ट्रभक्तीचा हुंकार, स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना जयंतीदिनी कोटी कोटी वंदन ! अशा शब्दात मानवंदना दिलीये.