पाढव्याच्या सभेला लाईट घालवणाऱ्या अधिकाऱ्यांना तुडवा- राज ठाकरे

टीम महाराष्ट्र देशा- येत्या गुढी पढाव्याच्या दिवशी राज ठाकरे यांची मुंबईत सभा होणार असून या सभेच्या वेळी जर महाराष्ट्र लाईट घालवण्यासारखे काही प्रकार घडले तर संबंधित अधिकाऱ्याला तुडवा असा आदेश महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कार्यकर्त्याना दिला आहे. राज ठाकरेंच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या 12 व्या वर्धापनदिनानिमित्त आज मुंबईत कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांच्या भव्य मेळाव्याचं आयोजन कऱण्यात आलं होतं यावेळी कार्यकर्त्यांशी संवाद साधताना ठाकरे यांनी हा आदेश दिला आहे.

मुंबईत रंगशारदा सभागृहात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी मनसेच्या सदस्य नोंदणी अभियानाला राज ठाकरे यांच्या हस्ते सुरुवात करण्यात आली. मागे मुंबईतील एका सभेच्या वेळी राज यांच्या सभेच्या वेळी बऱ्याच कार्यकर्त्यांनी लाईट गेल्याची तक्रार केली होती हाच धागा पकडून राज ठाकरे यांनी महावितरणच्याअधिकाऱ्यांवर निशाणा साधला. राज ठाकरे म्हणाले,मी आज फार बोलणार नाही .मला जे बोलायचं आहे ते गुढी पढाव्याच्या दिवशी जी सभा होणार आहे त्यात मी आपली भूमिका मांडणार आहे. मात्र पदाधिकाऱ्यांनी या सभेचा आगोदरच महावितरणच्या अधिकाऱ्यांशी बोलून ठेवा जेणेकरून लाईट घालवली जाणार नाही. एवढं करूनही जर लाईट गेलीच तर लाईट घालवणाऱ्या अधिकाऱ्यांना तुडवा असा आदेश ठाकरे यांनी दिला.