भाजपासारखे आकडे फेकायला आपण काय रतन खत्री आहोत का?: राज ठाकरे

टीम महाराष्ट्र देशा- आपण जी सदस्य नोंदणी करत आहोत ती इतर राजकीय पक्षांसारखी बोगस करायची नाही. भाजपासारखी आकडे दाखवण्यासाठी नोंदणी करायची नाही. आकडे फेकून काही होणार नाही. आकडे फेकायला आपण काय रतन खत्री आहोत का, अशा शब्दात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सदस्य नोंदणी मोहीमेचा शुभारंभ करताना भाजपाला चिमटा काढला आहे.

bagdure

मुंबईत रंगशारदा सभागृहात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी मनसेच्या सदस्य नोंदणी अभियानाला राज ठाकरे यांच्या हस्ते सुरुवात करण्यात आली. मागे मुंबईतील एका सभेच्या वेळी राज यांच्या सभेच्या वेळी बऱ्याच कार्यकर्त्यांनी लाईट गेल्याची तक्रार केली होती हाच धागा पकडून राज ठाकरे यांनी महावितरणच्याअधिकाऱ्यांवर निशाणा साधला. राज ठाकरे म्हणाले,मी आज फार बोलणार नाही .मला जे बोलायचं आहे ते गुढी पढाव्याच्या दिवशी जी सभा होणार आहे त्यात मी आपली भूमिका मांडणार आहे. मात्र पदाधिकाऱ्यांनी या सभेचा आगोदरच महावितरणच्या अधिकाऱ्यांशी बोलून ठेवा जेणेकरून लाईट घालवली जाणार नाही. एवढं करूनही जर लाईट गेलीच तर लाईट घालवणाऱ्या अधिकाऱ्यांना तुडवा असा आदेश ठाकरे यांनी दिला.

You might also like
Comments
Loading...