अल्बमध्ये नाचणाऱ्यांनी मला सांगू नये, राज ठाकरेंनी उडवली फडणवीसांची खिल्ली

टीम महाराष्ट्र देशा : या लोकसभा निवडणुकीत मनसे ने प्रत्यक्षरित्या भाग न घेता भाजप विरोधी प्रचाराचा दणका लावला आहे. त्यामुळे भाजप नेते आणि राज ठाकरे यांच्यामध्ये शाब्दिक युद्ध चालू आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंवर टीका करताना बेगानी शादी में अब्दुल्ला दिवाना असं म्हणून राज यांची खिल्ली उडवली होती. तर अल्बमध्ये नाचणाऱ्यांनी मला सांगू नये’ असा टोला राज यांनी देवेंद्र फडणवीस यांना लगावला आहे.

एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्याच्या टीकेला उत्तर दिलं आहे. गेल्या काही दिवसांपासून राज ठाकरे यांच्यावर मुख्यमंत्र्यांनी टीका करताना ‘रताळ्याला म्हणतात केळं आणि दुसऱ्याच्या लग्नात नाचतय खुळं’ असं म्हणत राज ठाकरेंची खिल्ली उडवली होती. तर राज ठाकरे यांची स्क्रिप्ट बारामती वरून येते असा देखील टोला मारला होता. त्यावर राज यांनी ‘द रिव्हर अँथम’ या अल्बममध्ये देवेंद्र फडणवीस यांनी जी भूमिका साकारली होती त्यावरुन हा टोला लगावला आहे.

याआधी देखील मुख्यमंत्री फडणवीस यांनी राज यांची खिल्ली उडवली होती. मनसे पहिल्यांदा महाराष्ट्र नवनिर्माण सेना त्यानंतर मतदार नसलेली सेना झाली आणि आत्ता उमेदवार नसलेली सेना म्हणजे उनसे झाली आहे असा टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मनसेला लगावला होता. त्यावर देखील राज यांनी प्रत्युत्तर दिले होते. बीजेपी म्हणजे भारतीय जुमला पार्टी आहे असा टोला राज यांनी लावला होता.Loading…
Loading...