मुंबई : काल महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात सर्वात मोठी घटना घडली. शिवसेनेच्या जवळपास ३९ आमदारांनी बंड केल्याने ठाकरे सरकारने अखेर बहुमत गमावलं आहे. यानंतर काल रात्री ९ वाजता फेसबुक लाईव्ह येत उद्धव ठाकरे यांनी राजीनामा देणार असल्याचं जाहीर केलं होत. त्यानंतर त्यांनी आपला राजीनामा राज्यपालनाकडे सुपूर्द केला. यानंतर यावर आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ट्विट केलं आहे.
राज्यात मोठ्या प्रमाणात राजकीय घडामोडींना वेग आला असताना दुसरीकडे राज ठाकरे मात्र शांत होते. पण आता राज ठाकरेंनी सुद्धा उद्धव ठाकरे यांच्या राजीनाम्यानंतर ट्विट करत मोठी प्रतिक्रिया दिली आहे. राज ट्विट मध्ये म्हणाले कि, एखादा माणूस ज्या दिवशी आपल्या नशिबाला स्वतःच कर्तृत्व समजू लागतो. त्या दिवसापासून त्याचा ऱ्हासाकडे प्रवास सुरु होतो. असं सूचक ट्विट त्यांनी केलय.
— Raj Thackeray (@RajThackeray) June 30, 2022
दरम्यान, महाविकास आघाडी बाबत काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी आता एक मोठी प्रतिक्रिया दिली. थोरात म्हणाले महाविकास आघाडी कायम आहे की नाही ते ठरवू. आमची चर्चा सुरू आहे. त्यानंतर महावीकास आघाडी बद्दल ठरवू, असं ते म्हणाले. त्यामुळे महाविकास आघाडी देखील संपुष्टात येण्याची चिन्हे दिसत आहेत. तसेच यानंतर आता महाविकास आघाडीचं पुढे काय होणार याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहेत.
महत्वाच्या बातम्या :
>>> आमच्या सोशल मीडिया फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील व्हा! फेसबुक & टेलिग्राम ग्रुप <<<
>>> आपल्या परिसरातील महत्त्वाच्या समस्यांना वाचा फोडून, तुमच्या बातमीने बदल घडवा. { बातमी पाठवा SUBMIT NEWS } <<<