राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा, म्हणाले डब्लूएचओ…

raj thackeray

मुंबई: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लॉकडाऊन तसेच अनलॉकबाबत एका मुलाखतीमध्ये आपले रोखठोक मत मांडले. गेले चार महिन्यांहून अधिक काळ कोरोना या रोगाने संपूर्ण राज्यासह देशात थैमान घातले आहे. इतिहासात पाहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणावर जागतिक महामारी आल्यामुळे पर्याय म्हणून लॉकडाऊन घोषित करण्यात आला. या रोगावर लस नसल्याने व रोगाचा संसर्ग अधिक वेगाने वाढत असल्याने रोगावर नियंत्रण मिळवण्यासाठी लॉकडाऊन करण्यात आले.

या संदर्भात एबीपी माझाचे संपादक राजीव खांडेकर यांनी राज ठाकरेंसोबत महाराष्ट्र व्हिजन मुलाखत घेतली. यावेळी, त्यांनी प्रश्न केला, लॉकडाऊन अपेक्षेपेक्षा जास्त काळ रेटला गेला का? यावर उत्तर देताना ठाकरे म्हणाले, ‘मी काय या गोष्टीतला तज्ञ नाही किंवा डब्लूएचओ (WHO) काही माझ्याकडून सल्ले घेत नाही, परंतु सुरुवातीला ज्या काही डॉक्टरांशी संवाद साधला त्यात त्यांचे म्हणणे होते कि सुरुवातीच्या काळातच अत्यंत कडक लॉकडाऊन पाळणं गरजेचं होत जे पाळलं गेलं नाही.’

आपल्याकडे लॉकडाउन, अनलॉकचा ताळमेळच नाही : राज ठाकरे

तसेच, “या सगळ्या गोष्टी आपण २३ मार्चपासून पाहतोय. सुरूवातीला कुणालाच त्याचा अंदाज नव्हता. आज जेव्हा सगळी आकडेवारी पाहतो. परंतु, आज आपण आकडा पाहिला. मागील महिना दीड महिन्यांपासून बाहेर पडताहेत. हा आकडा माझ्या मनात प्रश्नचिन्ह निर्माण करतो. १३० कोटींच्या देशात १३ लाख रुग्ण आहेत.”

पंजाब व महाराष्ट्र सहकारी बँकेच्या खातेदारांच्या ठेवीसाठी आर्बिट्रेटरने तातडीने कार्यवाही करावी’

“यात २७ हजार रुग्णांचा मृत्यू झाला. पण हे किती काळ चालवणार आहोत. लोकांच्या नोकऱ्यांचा प्रश्न निर्माण झाला आहे. व्यवसाय बुडले आहेत. या आकड्याकडे पाहिलं, तर अख्खा देश लॉकडाउनमध्ये ठेवणं गरजेचं आहे का?. मी मुख्यमंत्री, अजित पवार आणि शरद पवार यांना फोन करून सांगितलं की बस झालं आता. लोकांना वेठीस धरू शकत नाहीत,” असं सवाल राज ठाकरे म्हणाले.

शेतकऱ्यांच्या पिककर्जासाठी धनंजय मुंडे यांनी केले ‘हे’ आवाहन

तर, लोक अधिक घाबरले असून माध्यमांनी वारंवार दाखवलेल्या बातम्यांमुळे देखील परिणाम झाला. दरम्यान, ‘समाजामध्ये दुही निर्माण करणे चालणार नसल्याने मी यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र देखील लिहिले होते. त्यात बरे होणाऱ्यांचे आकडे येऊ दे असे सांगितले होते. याआधी देखील अनेक रोग येऊन गेले पण कधी मोजले नाहीत.’