fbpx

राज ठाकरेंनी व्यंगचित्रातून मराठी अस्मितेलाच केलं लक्ष्य

raj thakare

मुंबई: देशातील अन्य सर्व राज्यांच्या अस्मिता एकसंघ आहेत, मात्र मराठी अस्मिताच ठिगळं लागलेली असल्याचं मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी व्यंगचित्रात रेखाटलं आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या व्यंगचित्रातून मराठी अस्मितेवर परखडपणे बोट ठेवलं आहे. राज ठाकरे व्यंगचित्रातून वेळोवेळी परिस्थितीवर आपलं परखड मत मांडत असतात. यावेळी राज ठाकरेंनी मराठी अस्मितेलाच लक्ष्य केलं आहे.

(कालच मराठी राजभाषा दिन झाला, त्यानिमित्त मराठी भाषा, मराठी अस्मिता आणि देशातल्या इतर भाषिक आणि प्रांतिक अस्मिता याच्यावर एक व्यंगचित्र सुचलं होतं. काल ते पूर्ण होऊ शकलं नाही, पण आज ते इथे प्रसिद्ध करतोय. नक्की पहा आणि विचार करा. मराठी अस्मिता ही जातींच्या पलीकडे जायला हवी हीच इच्छा.)

raj thakare