fbpx

जितेंद्र आव्हाडांनी केले राज ठाकरेंच्या ‘त्या’ वक्तव्याच समर्थन

jitendra avhad and raj thakrey

मुंबई: मनसे अध्यक्ष राज ठाकरे  यांच्या शिवतीर्थावरील भाषणानंतर भाजपनेत्यांनी राज ठाकरे यांना लक्ष केले आहे. एकीकडे भाजप आमदार राम कदम, आशिष शेलार यांनी राज ठाकरेंच्या भाषणावर टीकास्त्र सोडले आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी राज ठाकरेंच्या अनेक मुद्द्यांना पाठिंबा दिला आहे.

राज ठाकरे यांच्या भाषणामुळे राजकीय वर्तुळात चांगल्याच हालचाली सुरु झाली आहेत.  शिवतीर्थावर राज ठाकरेंनी मोदिमुक्त भारताची घोषणा केली. ” भारताला १९४७ साली पहिलं स्वातंत्र्य मिळालं, दुसरं स्वातंत्र्य १९७७ साली मिळालं आणि आता २०१९ साली भारताला तिसऱ्या स्वातंत्र्याची गरज आहे. मोदीमुक्त भारत करा,” आणि गुजराती पाट्या, या मुद्द्यांवरुन आव्हाडांनी राज ठाकरेंचं समर्थन केले आहे.

“हिंदू-मुस्लिम लढवल्याशिवाय भाजप जिंकू शकत नाही, हे राज ठाकरे बोलले तर बरोबर आहे. देश तुटला तरी चालेल पण सत्ता मिळाली पाहिजे, अशी भाजपची भूमिका.”, असेही आव्हाड म्हणाले.