राज ठाकरेंचे चिरंजीव अमित ठाकरे होणार राजकारणात सक्रिय?

blank

टीम महाराष्ट्र देशा : महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकारणात घराणेशाही म्हणजे जनतेला काही नवीन नाही. कारण ठाकरे कुटुंबातील राजकारणात तिसरी पिढी रुजू होताना आपल्याला लवकरच पाहायला मिळेल. आता राजकारणात राज ठाकरेंचे चिरंजीव अमित ठाकरे त्यांच्या पक्षातील काही नेत्यांच्या हट्टामुळे प्रवेश करणार असल्याची माहिती समोर येतेय.

सूत्रांच्या माहिती नुसार त्यांच्यावर लवकरच एखादी जबाबदारी देण्यात येणार आहे. यासाठी पक्षात तयारी सुरु आहे. पक्षाच्या राजकीय अभ्यासासाठी ते मुंबईतील अनेक शाखांना भेट देऊन कार्यकर्त्यांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेत आहेत.गेल्या महिन्यात पक्षाची राजकीय बैठक पार पडली यात बाळा नांदगावकर यांच्यासह इतर नेत्यांनीही त्यांना राजकारणात उतरवण्याची मागणी केली. तेव्हा पासून मनसेचे पक्षप्रमुख राज ठाकरे यांच्या आदेशानुसार अमित ठाकरे पक्षाच्या अनेक कार्यकर्त्यांच्या भेटी गाठी घेत आहेत.

अमित ठाकरेंच्या राजकारणातील सुरुवातीला किंवा त्यांच्या वाटचालीवर कोणी ही आक्षेप घेतला नाही. त्याचबरोबर अमित ठाकरेंची जी लोकप्रियता आहे ती राजकारणाशी जोडली जावी. अशी त्यांची इच्छा आहे. याआधी त्यांनी नगरपालिकांच्या निवडणुकींचा प्रचार केला होता मात्र त्यांच्यावर कोणतीही जबाबदारी नव्हती. याशिवाय २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत ही त्यांनी मनसेसाठी प्रचार केला होता.

अमित ठाकरे २०१७ च्या नगरपालिका निवडणुकीवेळी आजारी असल्यामुळे ते आपल्याला प्रचारात दिसले नव्हते. मात्र ते आता पूर्ण तयारीला लागले आहेत. त्यासाठी ते सोशल मिडीयाचाही वापर करताना दिसत आहेत. त्यांचबरोबर त्यांचा या वर्षी त्यांची बालपणाची मैत्रीण मिताली सोबत साखरपुडा झाला आहे.राज ठाकरे आणि अमित ठाकरे यांच्या स्वभावात फरक असला तरी ते वडिलांपेक्षा कमी नाहीत. त्यांनी आर्केटेक्चरचं शिक्षण पूर्ण केलंय तेही व्यंगचित्रकार आहेत त्याचबरोबर ते स्केचिंग हि करतात. ते फुटबॉल खेळतात आता प्रतीक्षा आहे ती अमित ठाकरे कोणत्या आणि कश्या पद्धतीने राजकारणात उडी मारतात.

रजनीकांतची नवी वेबसाईट लाँच!

उद्धव ठाकरेंच्या नव्हे तर ‘यांच्या’ गाडीवर झाली दगडफेक