राज ठाकरेंना भाजपचे व्यंगचित्रातूनच जशाच तसे उत्तर ; राज म्हणजे ‘बोलघेवडा पोपट’

टीम महाराष्ट्र देशा : नुकतीच नरेंद्र मोदीनी एएनआयला मुलाखत दिली होती त्यावरून राज ठाकरेंनी व्यंगचित्र काढत ही मुलाखत फिक्स होती, त्यांचेच प्रश्न आणि त्यांचीच उत्तर अशा स्वरुपाची मनमोकळी मुलाखत होती, असं टोला त्यांनी मारला होता. आता भाजपनेही त्यांना आता त्यांच्याच भाषेत प्रत्युउत्तर दिल आहे. काही महिन्यापूर्वी ‘शोध मराठी मनाचा’ या कार्यक्रमात शरद पवारांची मुलाखत घेतली होती.ती मुलाखत बरीच गाजली.आता भाजपने त्या मुलाखतीचा संदर्भ घेऊन ‘क्रोध मोदींच्या यशाचा’ या मथळ्याखाली व्यंगचित्र काढून भाजपच्या अधिकृत ट्वीटर अकाउंंटवर प्रसिद्ध केले आहे.

भाजपने काढलेल्या या व्यंगचित्रात ठाकरे आणि शरद पवारांची ती मुलाखत ‘एक सेटिंगवाली मुलाखत’ असल्याचेही म्हणले आहे.बारामतीच्या पोपटाने घेतलेल्या मुलाखतीमध्ये बारामतीच्या साहेबांनी मोदींवर पुन्हा टीका केली अशा आशयाच्या बातम्या येतील,असं म्हणत राज ठाकरेंना बोलघेवडा पोपट म्हणून टोमणा मारला आहे.

त्यात राज ठाकरे शरद पवार यांना, ‘साहेब बोला काय विचारू’ असं म्हणताहेत. त्यावर, ‘पाळीव पत्रकारांनी सेट करून दिलेले मोदी विरोधी प्रश्न विचारा, उत्तरं तयार आहेत’, असं पवार सांगत असल्याचं दाखवण्यात आलंय.तर ट्विटमध्ये शरद पवार राज ठाकरेंना म्हणतात, बुलेट ट्रेनमध्ये गरीब प्रवास करतील काय? असा प्रश्न नको विचारू राज! मग ते मला विचारतील लवासा गरिबांसाठी होतं काय? त्यापेक्षा आपलं ठरलेलं चालू दे! अशा प्रकारचे ट्विट करून भाजपने राज ठाकरेसह शरद पवारांनाही टोमणा मारत एका दगडात दोन पक्षी मारले असल्याचे दिसत आहे.