fbpx

आज राज ठाकरे उलगडणार शरद पवारांचे ‘राज’कारण

raj thakare vr sharad pawar

पुणे : आज जागतिक मराठी सम्मेलनानिमित्त मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची आज २१ फेब्रुवारीला अभूतपूर्व मुलाखत घेणार आहेत. या मुलाखतिकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या मुलाखतीच्या माध्यमातून अव्वल राजकीयपटू शरद पवारांचे ‘राज’कारण पर्व उलगडणार का? राजकीय बुद्धिबळपटू त्यांच्या राजकीय चाली बाहेर काढण्यात राज ठाकरेंना यश येणार का? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.

पन्नास वर्षांच्या कारकिर्दीमध्ये एकही निवडणूक न हारण्याचे पवार साहेबांचे रेकॉर्ड आहेत. राजकारणात मुरलेल्या साहेबांना बोलतं करण्याचं आव्हान भल्याभल्यांना घाम फोडते, मात्र आज साहेबांची मुलाखत घेणारा कोणी पत्रकार नसून मोठ राजकीय व्यक्तिमत राज ठाकरे आहेत. त्यामुळे या मुलाखतीला वेगळाच रंग येणार आहे,

आज पुण्यातल्या बीएमसीसी महाविद्यालयात हा कार्यक्रम पार पडणार आहे. पवारांच्या राजकीय कारकीर्दीला ५० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्तानं प्रसिद्ध हास्यकवी रामदास फुटाणे यांनी या प्रकट मुलाखतीचं आयोजन केलं आहे. राजकारणातल्या दोन पिढ्यांचा सहभाग असलेल्या या मुलाखतीची उत्सुकता आता शिगेला पोचली आहे. या आधीच कोरेगाव भीमा हिंसाचारामुळे ३ जानेवारीला नियोजित मुलाखतीचा कार्यक्रम रद्द करण्यात आला होता. पण अखेर तो दिवस आज आला आहे. आज संध्याकाळी पाच वाजता राज ठाकरे शरद पवारांची मुलाखत घेणार आहे.