‘आयसीयू’त असणारा भारत निवडणुकीनंतरच शुद्धीवर येईल: राज ठाकरे

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी धनत्रयोदशीच्या निमित्तानं एक खास व्यंगचित्र प्रसिद्ध केलं आहे. यामध्ये राज यांनी धन्वंतरीच्या माध्यमातून देशाच्या परिस्थितीवर मार्मिक टीका करत पुन्हा एकदा केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे.

राज ठाकरे यांच्या या व्यंगचित्रात देश आयसीयूमध्ये उपचार घेत असल्याचं दाखवण्यात आलं आहे. तर आरोग्याची देवता असलेली धन्वंतरी देशातील लोकांना भारताच्या आरोग्याबद्दल माहिती देताना दिसत आहे. वैद्यकीय शास्त्राचा देव धन्वंतरी ह्याचा जन्मदिवस म्हणूनही काही लोक हा दिवस महत्त्वाचा मानतात, असे त्यांनी राज ठाकरे यांनी म्हटले आहे.

राज ठाकरे यांनी दिवाळीचं औचित्य साधून व्यंगचित्राची मालिका घेऊन येणार असल्याचे रविवारी ट्विटरवरुन जाहीर केले होते. या मालिकेतील पहिलं व्यंगचित्र त्यांनी धनत्रयोदशीनिमित्त रेखाटले आहे. सोमवारी सकाळी त्यांनी हे व्यंगचित्र ट्विटरवर पोस्ट केले. धनत्रयोदिवशी हा दिवस अनेक प्रकारे साजरा केला जातो.