मुख्यमंत्र्यांची व्यंगचित्राच्या माध्यमातून राज ठाकरेंनी ‘अशी’ उडविली खिल्ली

टीम महाराष्ट्र देशा- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे जसे राजकीय व्यक्ती म्हणून प्रसिद्ध आहेत तसे एक उत्तम व्यंगचित्रकार म्हणून देखील प्रसिद्ध आहेत. राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा आपल्या व्यंगचित्रातून भाजप सरकारला टोला लावला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘मीच होणार पुन्हा मुख्यमंत्री ‘असा दावा केला होता . त्यावरून राज ठाकरे यांनी ‘मुख्यमंत्र्यांचा वैचारिक दुष्काळ’ अशा मथळ्याचे व्यंगचित्र साकारले आहे . राज ठाकरे यांच्या अधिकृत ट्विटर अकाउंट वरून हे व्यंगचित्र प्रसिद्ध करण्यात आले आहे.

1 लाख 20 हजार विहिरी, हागणदारी मुक्त महाराष्ट्र, इतर थापा असं लिहिलेल्या कागदपत्रांवर फडणवीस पाय ठेवून झोपल्याचे या चित्रात दिसत आहे. विशेष म्हणजे, फडणवीस एका नावेत झोपले असून ती नाव कोरड्या जमिनीवर खोल पाण्यात बुडाल्याचे दिसून येते. या नावेवर महाराष्ट्र राज्यातील आर्थिक स्थिती असे लिहिले आहे. याचाच अर्थ, राज्याची आर्थिक स्थिही ही या बुडालेल्या नावेप्रमाणेच असल्याचे राज यांनी सूचवले आहे. तर बाजूलाच नावेला टेकून अर्थमंत्री सुधीर मुनगुंटीवार उभारले आहेत. तसेच राज्यातील दुष्काळसदृश्य परिस्थितीवर भाष्य करताना, 201 तालुक्यात दुष्काळ असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

You might also like
Comments
Loading...