राज ठाकरे सोनिया गांधींच्या भेटीला, निवडणुकीच्या दृष्टीने नवी समीकरणे उदयास येण्याची शक्यता

टीम महाराष्ट्र देशा : मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज दिल्ली दौऱ्यावर आहेत. सकाळी राज ठाकरे यांनी ईव्हीएम संदर्भात निवडणूक आयोगाचे मुख्य अधिकारी यांची भेट घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली. तर सायंकाळी राज ठाकरे हे काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेतली आहे. राज ठाकरे हे सोनिया गांधी यांच्या भेटीला गेल्याने राजकीय वर्तुळात उलट सुलट चर्चांनी जोर पकडला आहे. तर येत्या विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेस आघाडीमध्ये राज ठाकरेंचा मनसे पक्ष दिसणार असल्याच दिसत आहे.

राज ठाकरे यांनी सोनिया गांधींच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली. त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने नवी समीकरणे उदयास येण्याची शक्यता आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी मनसेला सोबत घेण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने केलेल्या प्रयत्नांना काँग्रेसने विरोध केला होता. मात्र आता राज ठाकरे हे थेट सोनिया गांधींच्याच भेटीला गेल्याने मनसेला महाराष्ट्रातील महाआघाडीत सामावून घेण्याची प्रक्रिया नव्याने सुरू होण्याची चर्चा नव्याने सुरू झाली आहे.

दरम्यान लोकसभा निवडणुकीत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजप विरोधी भूमिका घेतली होती. तसेच आपला एक ही उमेदवार उभा नसताना राज ठाकरे यांनी भाजप विरोधी प्रचार केला होता. त्यामुळे राज ठाकरे यांची भूमिका ही कॉंग्रेसच्या भूमिकेशी मिळती जुळती असल्याने येत्या विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेस आघाडीमध्ये सहभागी होण्याचा मनसेचा प्लॅन राज ठाकरेंच्या या भेटीत सफल होणार का? याबाबत राजकीय चर्चा सुरु झाल्या आहेत.Loading…
Loading...