राज्य सरकारकडून प्रतिसाद न मिळाल्याने मराठा विद्यार्थी राज ठाकरेंच्या भेटीला

टीम महाराष्ट्र देशा : वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी आरक्षण लागू न केल्याने मराठा समाजाचे विद्यार्थी आक्रमक झाले आहेत. यासंदर्भात त्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली आहे. दरम्यान मुख्यमंत्र्यांची आणि शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांची भेट घेऊन चर्चा करू असे आश्वासन राज ठाकरे यांनी विद्यार्थ्यांना दिले आहे.

Loading...

वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमात मराठा आरक्षणासंदर्भातली राज्य सरकारची याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली आहे. राज्य सरकारला सर्वोच्च न्यायालयाने जोरदार दणका दिला आहे. या पार्श्वभूमीवर वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांनी वर्षा निवासस्थानी जाऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली. यावेळी तुमच्यावर अन्याय होऊ देणार नाही, असं आश्वासनं मुख्यमंत्र्यांनी विद्यार्थ्यांना दिले होते.

याच मुद्द्यावरून मराठा समाजातील वैद्यकीय विद्यार्थ्यांनी आझाद मैदानात आंदोलन छेडलंय. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांच्यात वैद्यकीय पदव्युत्तर प्रवेशाबाबत मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर बैठक झाली. या बैठकीनंतर हालचालींना वेग आला असून वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन आझाद मैदानावर विद्यार्थ्यांची भेट घेणार आहेत.

याचदरम्यान, अद्यापही राज्य सरकारकडून प्रतिसाद न मिळाल्याने पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे शिष्टमंडळानी आझाद मैदानातून ठाण्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. त्यावेळी विद्यार्थ्यांचे म्हणणे ऐकून घेत, या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांची भेट घेऊन या विषयी चर्चा करू. तसेच यावर लवकर तोडगा काढू असे आश्वासन राज ठाकरे यांनी दिले आहे. असे मराठा आंदोलक रामेश्वर भोसले यांनी सांगितले.

विशेष म्हणजे आज ठाण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर तसेच दुष्काळ मुद्यावरून राज्य सरकार वर हल्लाबोल केला. याचबरोबर सरकारने मराठा समाजातील तरुणांची फसवणूक केली आहे असा आरोपही त्यांनी केला.Loading…


Loading…

Loading...